व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असणे हे हल्ली खरंतर खूप कॉमन झालं आहे. परंतु सुरुवातीला काही काळ आपल्याला व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता आहे हेच रुग्णाच्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे त्यावर उपचार करण्यास उशीर होतो.
आज आपण व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेविषयी अधिक जाणून घेऊया. व्हिटॅमिन बी १२ कमी असेल तर काय लक्षणे जाणवतात, काय आजार होऊ शकतात हे आपण जाणून घेऊया. तसेच अशी कमतरता का होते त्याची कारणे देखील जाणून घेऊया.
व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असण्याची लक्षणे
१. अतिशय थकवा, अशक्तपणा
एखादी व्यक्ती जर थोड्याशा श्रमाने देखील दमून जात असेल, सतत थकवा, निरुत्साह वाटत असेल आणि अशक्तपणा आला असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असण्याची शक्यता असते. अशा वेळी रक्ततपासणी करून व्हिटॅमिन बी १२ ची पातळी तपासून पाहणे आवश्यक आहे.
२. भूक न लागणे, बद्धकोष्ठता
व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असेल तर भूक न लागणे, योग्य प्रमाणात जेवण न जाणे आणि खाल्लेले अन्न न पचणे अशी लक्षणे दिसून येतात. पोट नीट साफ न होणे, बद्धकोष्ठ अशी लक्षणे देखील आढळतात.
३. दृष्टिदोष
जर तुम्हाला आपल्या दृष्टीवर (दिसण्यावर) परिणाम झाला आहे असे वाटत असेल, कमी किंवा धूसर दिसते असे वाटत असेल तर इतर तपासण्यांबरोबर व्हिटॅमिन बी १२ ची तपासणी देखील करून घ्या कारण व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे दृष्टिदोष उत्त्पन्न होऊ शकतो.
४. जास्त स्ट्रेस किंवा चिंता
एखादी व्यक्ती जर जास्त प्रमाणात चिंता, काळजी करत असेल, घाबरून जात असेल किंवा एखाद्या परिस्थितीचा खूप स्ट्रेस घेत असेल तर त्या व्यक्तीमध्ये व्हिटॅमिन बी १२ची कमतरता असू शकते.
५. गरोदरपणात अस्वस्थ वाटणे
गरोदरपणात शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची जास्त गरज भासते. अशा वेळी जर गरोदर स्त्रीला वारंवार अस्वस्थ वाटत असेल तर एकदा व्हिटॅमिन बी १२ ची तपासणी करून घ्यावी. कमतरतेमुळे असे होऊ शकते.
व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे अनेक आजार होतात. ह्यापैकी काही आजार सहज बरे होणारे तर काही आजार गंभीर आहेत. त्यामुळे अधिक काळ व्हिटॅमिन बी १२ ची शरीरात कमतरता असणे योग्य नाही.
व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे कोणते आजार होतात ते आपण पाहूया
१. ऍनिमिया
जर अधिक काळपर्यंत व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता शरीरात राहिली तर त्या व्यक्तीला ऍनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता निर्माण होऊ शकते जे आरोग्यासाठी घातक आहे.
२. अस्थीरोग
व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे संधीवात, आमवात, पाठ, कंबर दुखणे, हाडे ठिसूळ होणे असे आजार होऊ शकतात.
३. डिमेन्शिया किंवा स्मृतिभ्रंश
व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता थेट मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकते. त्यामुळे जर अधिक काळ व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता शरीरात राहिली तर मेंदूचे कार्य विस्कळीत होऊन सुरुवातीला स्मृतीभ्रंश ते पुढे व्यक्तीचा स्वतःवर ताबा न उरणे इथपर्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात.
४. गरोदरपणातील कमतरतेमुळे होणाऱ्या अर्भकास त्रास
जर गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असेल तर नवजात अर्भक देखील व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता घेऊन जन्माला येऊ शकते. त्यामुळे त्या अर्भकाला देखील पुढे हे त्रास सहन करावे लागू शकतात.
व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे वरील गंभीर आजार होऊ शकतात. परंतु मुळात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता का निर्माण होते ते आपण पाहूया.
व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता होण्याची कारणे खालीलप्रमाणे
१. खाल्लेल्या अन्नातील व्हिटॅमिन बी १२ शरीरात नीट शोषले न जाणे
२. भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी १२ असणारा आहार जसे की मांसाहार, दही, दूध इत्यादी पुरेशा प्रमाणात न घेणे
३. शाकाहारी असणाऱ्या लोकांमध्ये व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता जास्त आढळून येते कारण व्हिटॅमिन बी १२ चा प्रमुख स्रोत मांसाहार आहे.
अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन बी १२ ची औषधे आणि इंजेक्शने घेऊन ह्या कमतरतेवर सहज मात करता येते.
तर मित्र मैत्रिणीनो, तुमच्यामध्ये वरील काही लक्षणे असल्यास व्हिटॅमिन बी १२ तपासणी जरूर करून घ्या. कमतरता असल्यास योग्य आहार आणि डॉक्टरांनी दिलेली औषधे घ्या आणि ह्या कमतरतेवर मात करा.
अशक्तपणा घालवण्यासाठी व्हिटॅमिन बी-12 वाढवण्याचे घरगुती उपाय वाचण्यासाठी येथे क्लिक करा
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
छान , परिपूर्ण माहिती दिलीय. खूपच ऊपयोगी.व्हिटॅमिन बी १२ ल तितकस महत्व दिल जात नाही. ल