खरे वाटणार नाही पण बिहार, आसाममध्ये उगणारा हा तांदूळ थंड पाण्यात शिजतो!!

भारतीय जेवणात तांदूळ हा प्रमुख अन्नघटक आहे. आपल्या देशात विविध प्रांतात तांदळाच्या अनेक जाती आढळतात.

महाराष्ट्रातील आंबेमोहोर, इंद्रायणी, आजरा घनसाळ तर कोकणातील लालसर रंगाचा उकडा तांदूळ प्रसिद्ध आहेत.

याचप्रमाणे बासमती तांदूळ विदेशात सुद्धा आवडीने खाल्ला जातो. तांदळाच्या विविध जातीनुसार त्यापासून साधा भात ते चविष्ट बिर्याणी पर्यंत कित्येक पदार्थ बनवले जातात.

तांदळापासून भात करण्यासाठी उकळत्या पाण्यात तांदूळ शिजवून घ्यावा लागतो. पण आम्ही तुम्हाला अशा एका तांदळाची माहिती देणार आहोत जो थंड पाण्यात फक्त भिजवून ठेवला की भात तयार करता येतो. आश्चर्य वाटलं ना?

आणि हा तांदूळ भरपूर औषधी गुणधर्म असलेला आहे.

बिहार मधील पश्चिम चंपारण भागातील बेथिया येथे हा तांदूळ पिकवला जातो. नरकटियागंज हे बेथियामधील एक छोटेसे गाव आहे. येथे रहाणारे कमलेश चौबे हे शेतकरी या आश्चर्यकारक तांदळाची शेती करतात.

त्यांच्या शेताचं एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे इथे पिकवले जाणारे रंगीबेरंगी जातीचे तांदूळ.

पीक तयार झाले की कापणी केली जाते. त्यानंतर जो तांदूळ निघतो तो थंड पाण्यात भिजवून ठेवला, की त्याचा भात तयार होतो. गरम पाणी, गॅस, चूल, प्रेशर कुकर कशाचीही गरज नाही.

कमलेश चौबे सांगतात की हा तांदूळ पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने पिकवला जातो. यासाठी कोणतीही रासायनिक खते ते वापरत नाहीत.
हा तांदूळ थंड पाण्यात साधारण चाळीस ते साठ मिनिटे भिजवून ठेवला की भात तयार होतो. तसेच याचे औषधी गुणधर्म खूपच लाभदायक आहेत.

अशा प्रकारे बनविलेला भात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयोगी आहे. यात कॅल्शियम व व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. तसेच डायबिटीस असलेल्या व्यक्तींनी हा भात खाल्ला तर शुगर कंट्रोल साठी मदत होते. यामध्ये १०.७३% फायबर तर ६.८% प्रोटीन असतात.

कमलेश चौबे यांच्या शेतात काळ्या, लाल व हिरव्या रंगाच्या तांदळाचे पीक घेतले जाते. हे सर्वच थंड पाण्यात शिजणारे आहेत त्यामुळे यांना मॅजिक राईस अर्थात जादूई तांदूळ असे म्हणतात.

वजन वाढले असेल तर आहारातून भात वजा करा असे सांगितले जाते पण या मॅजिक राईसचा भात मात्र वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे. इतकंच नाही तर कॅन्सर मधे देखील हा भात खूपच गुणकारी आहे.

या तांदळाची किंमत दिडशे ते दोनशे रुपये प्रति किलो आहे.

औषधी गुणधर्म युक्त असा हा तांदूळ चवीला सुद्धा अप्रतिम असून याला आंब्याच्या मोहोरासारखा मंद सुगंध येतो.

आसाम तसेच पश्चिम बंगालच्या काही भागात सुद्धा हा तांदूळ पिकवला जातो. पण तांदळाची ही जात सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

जसजसे याचे अनेक औषधी उपयोग सर्वांना समजत आहेत तशी, आणि सोशल मीडिया वरील प्रचारामुळे याची मागणी वाढू शकेल असी कमलेश यांना आशा आहे.

म्हणूनच कमलेश चौबे यांनी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केले आहे की त्यांनी या प्रकारचा तांदूळ आपापल्या शेतात पिकवावा.

यामुळे देशातील जनतेचे आरोग्य तर सुधारेलच आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात इंधनाची बचत होईल.

मॅजिक राईसची ही माहिती आवडली असेल तर लाईक व शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय