बहुगुणी पेरूचे आरोग्यासाठी आहेत कित्येक फायदे!! वाचा या लेखात

पेरू हे आपल्या देशात, प्रांतात अगदी सहजपणे मिळणारे फळ आहे. ग्रामीण भागात किंवा शहरातही अनेक ठिकाणी पेरूची झाडे आढळतात.

आणि बाजारात देखील पेरू अगदी सहजपणे उपलब्ध असतात. ज्याला खऱ्या अर्थाने आपल्या मातीतलं फळ म्हणत येईल असं फळ म्हणजे पेरू!!

काहीसा आंबट, तुरट आणि गोड लागणारा पेरू हा नुसताच चवदार नसून त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत.

तसेच पेरू पौष्टिक देखील आहे. आज आपण पेरूचा विविध आजारांवर घरगुती उपाय म्हणून कसा उपयोग होतो ते जाणून घेऊया.

पेरूचे फायदे व उपयोग

आयुर्वेदात पेरूचे सेवन करण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. पेरू हा स्त्रियांमध्ये अंगावरचे दूध वाढवणारा, पुरुषांमध्ये शुक्राणू आणि पौरुषत्व वाढवणारा आणि मेंदूची ताकद वाढवणारा आहे.

तसेच पेरू मुळे तहान शमते, पोटातील कृमि नष्ट होतात, हृदयगती सुधारते, उलटी येणे कमी होते, कफ कमी होतो, डोकेदुखी कमी होते.

तसेच पेरू पोट साफ करण्यास मदत करतो. तोंड येण्यावर, ताप किंवा फेफरे येण्यावर देखील पेरू गुणकारी आहे.

चला तर मग, आपण विस्ताराने पेरूचे फायदे जाणून घेऊ या

१. डोकेदुखी– कच्चा पेरू किसून त्याचा लेप सूर्योदयापूर्वी डोक्याच्या दुखणाऱ्या भागावर लावला असता डोकेदुखी कमी होते. असे दिवसातून ३, ४ वेळा केल्यास डोकेदुखीचा त्रास उद्भवणे कमी होते.

२. सर्दी/ खोकला– जुनाट सर्दीमुळे त्रस्त झालेल्या लोकांसाठी पेरू हे वरदान आहे, जुनाट सर्दीमुळे ज्यांचे नाक चोंदलेले असते, कफ पडत नसतो अशा लोकांनी एक मोठा पेरू बिया काढून खावा आणि वर पाणी प्यावे.

२, ३ दिवसातच चोंदलेले नाक मोकळे होऊन कफ पडून जाईल व सर्दीपासून आराम मिळेल.

जर कोरडा खोकला येत असेल तर सकाळी लवकर एक पेरू चावून चावून खाण्यामुळे २, ३ दिवसात आराम पडतो.

तसेच पेरूचा रस काढून त्यात मध मिसळून ते पिण्याने देखील खोकला कमी होतो. पेरू मध्ये विटामीन ‘सी’ असल्यामुळे तो सर्दी, खोकल्यावर विशेष उपयोगी आहे.

३. तोंड येणे/दात दुखी– पेरूची ३, ४ पाने चावल्यामुळे दात दुखी कमी होते. तसेच पेरूच्या पानांचा काढा करून त्या काढयाने चूळ भरणे देखील दात दुखीवर फायद्याचे ठरते.

पेरूची कोवळी पाने काथ घालून चावून खाण्यामुळे तोंड येणे बरे होते.

तसेच पेरूच्या पानांचा काढा करून त्यात मीठ घालून त्या पाण्याने चूळ भरली असता तोंडात येणारे व्रण, जखमा, बऱ्या होण्यास मदत होते.

४. हृदयविकार– पेरूच्या बिया काढून त्याचे बारीक तुकडे करून मंद आचेवर शिजवून चटणीप्रमाणे खाल्ले असता हृदयरोगावर फायदा होतो.

५. उलटी येणे– जर वारंवार उलटी येत असेल तर पेरूच्या पानांचा काढा १० मिलि घेतल्यामुळे उलटी येणे बंद होते.

६. तहान भागते– मधुमेहामुळे किंवा मुत्रदोषांमुळे वारंवार तहान लागून शोष पडत असेल तर पेरूचे तुकडे काही वेळ पाण्यात घालुन ठेवून ते पाणी प्यायले असता तहान शमते. शोष पडणे बंद होते.

७. जुलाब– पेरूची मुळे पाण्यात उकळून ते पाणी ६ मिलि एका वेळी असे दिवसातून ३ वेळा पिण्यामुळे लहान मुलांना होणारा जुलाबाचा त्रास कमी होतो.

तसेच पेरूच्या पानांचा काढा देखील जुलाबावर उपयुक्त आहे. पेरूची साल किंवा पेरूच्या सालीचे चूर्ण सेवन केल्यामुळे जुलाब, अतिसार, फूड poisoning, उलटी येणे, अपचन इत्यादि बरे होण्यास मदत होते.

८. बद्धकोष्ठता– सकाळी काळी मिरी आणि सैंधव घालून पेरूचे तुकडे खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता, पोट फुगणे, ढेकर येणे ह्या आजारांवर फायदा होतो. पेरूचा मुरांबा खाल्ल्यामुळे देखील फायदा होतो.

९. पोटदुखी– ऍसिडिटी मुळे जर पोट दुखून जळजळ होत असेल तर पेरूच्या पानांचा काढा घेणे गुणकारी आहे. पेरूमध्ये antacid चे गुणधर्म असल्यामुळे ऍसिडिटी कमी होते.

१०. उष्णता कमी करणे– शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी पेरूचा निश्चित उपयोग होतो. आयुर्वेदानुसार पेरू हा मूळचा थंड प्रवृत्तीचा आहे त्यामुळे पेरूचे सेवन शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देते.

११. हिमोग्लोबिन वाढवणे– पेरूमध्ये बऱ्याच प्रमाणात लोह असल्यामुळे पेरूचे नियमित सेवन हे हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते.

१२. संधिवात– संधीवाताच्या दुखण्यावर पेरू गुणकारी आहे. पेरूची कोवळी पाने वाटून त्याचा लेप जर दुखऱ्या जागेवर लावला तर वातामुळे होणारे दुखणे कमी होते.

मात्र पेरूचे सेवन मर्यादित स्वरूपात केले पाहिजे. पेरूमध्ये फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे त्याचे अतिसेवन हे धोकादायक ठरू शकते. पोट बिघडण्याची शक्यता असते. मात्र प्रमाणात खाल्लेला पेरू हा औषधी व अत्यंत गुणकारी आहे.

पेरू बद्दलचे समज गैरसमज

१. थंडीत पेरू खाऊ नये, पेरूमुळे सर्दी होते.

हा मोठा गैरसमज आहे. ताजे पेरू खाल्ल्यामुळे शरीराला विटामीन ‘सी’ मिळून शरीराची रोग प्रतिकारक शक्ति वाढते आणि उलट सर्दी ई. आजार न होण्यास मदत होते. शिवाय पेरू खाल्ल्या मुळे पचन नीट प्रकारे होते.

२. पेरूची पाने खरंच गुणकारी असतात का?

पेरूची फळे जितकी स्वादिष्ट आणि गुणकारी असतात तितकीच त्याची पाने देखील गुणकारी असतात.

स्वच्छ धुवून वापरलेली पेरूची कोवळी पाने अनेक औषधी फायदे देतात. शरीराची immunity वाढवतात.

तर असा हा बहू गुणकारी पेरू. सहजपणे कुठेही उपलब्ध असणारा. ह्याचे नियमित सेवन करा आणि रोगांना दूर ठेवा.

स्वस्थ रहा, आनंदी रहा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, ortreatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय