आता राहा आयुष्यभर टेन्शन फ्री….. अगदी लॉक डाऊन नंतरही
नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो….! कसे आहात सगळे …???? मला माहिती आहे खरंतर या, लॉकडाऊनच्या काळात असा प्रश्न विचारणे धाडसीपणा ठरेल. सर्वत्र फक्त कोरोना चे थैमान…. संक्रमण आणि मृत्यूची टांगती तलवार, बेरोजगारी… आणि या सर्व अनिश्चिततेचे सावट घेऊन घरात गेल्या अनेक दिवसापासून संयमाच्या कसोटीला पुरेपूर उतरून घरात जायबंदी झालेले आपण…..