बँकिंग व्यवहार करताना हे नियम आपण माहित करून घेतलेच पाहिजेत

बँकिंग व्यवहार

अनेकजण नियम काय आहेत हेच माहीती करून घेत नाहीत अथवा नियम माहीत असेल किंवा इतरांकडून समजला आणि आपल्यावर अन्याय झाला असेल तर त्याची योग्य ठिकाणी तक्रार करून पाठपुरावा करण्याऐवजी ज्यांचा या गोष्टीशी संबंध नाही अशा लोकांसमोर आपले गाऱ्हाणे गात बसतात. ही वृत्ती सोडून नियम काय आहेत ते माहीती करून घ्यावे आणि जरूर पडल्यास संबंधितांच्या लक्षात आणून द्यावेत.

इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज (India INX) बद्दल हे माहित आहे का तुम्हाला?

इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज (India INX)

इंडिया इंटरनॅशनल एक्सचेंज (India INX) हा मुंबई शेअरबाजारांने आपल्या उपकंपनीमार्फत स्थापन केलेला आणि भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय शेअरबाजार आहे. 9 जानेवारी 2017 रोजी या बाजाराचे उद्घाटन आपल्या पंतप्रधानांनी केले आणि 16 जानेवारी 2017 पासून नियमित सौदे होण्यास सुरुवात झाली. गांधीनगर अहमदाबाद येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या गुजरात इंटरनॅशनल फायनान्स अँड टेक सिटीमध्ये याचे मुख्यालय आहे. या … Read more

गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT-City) काय आहे माहित आहे का तुम्हाला?

गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी (GIFT-City)

येथे कार्यालये, निवासी क्षेत्र, शाळा, हॉस्पिटल, हॉटेल्स, करमणूक केंद्रे असतील. घरातून कामाच्या ठिकाणी सहज चालत जाता येईल अशी येथे व्यवस्था आहे, भविष्यात ज्यांना सायकलने यायचे आहे त्यांच्यासाठी विशेष मार्गिकेची योजना आहे. याशिवाय बाहेरुन सहज येता येईल अशी वाहतूक व्यवस्था आहे. याची रचना आर्थिक आणि माहिती तंत्रज्ञान यावरील उद्योगांना केंद्रस्थानी धरून करण्यात आली आहे.

मर्यादित भागीदारी / Limited Liablity Partnership म्हणजे काय?

व्यवसाय भागीदारीत करता येतो हे आपल्याला माहिती आहेच. अशा पारंपरिक भागीदारीत प्रत्येक भागीदारची जबाबदारी अमर्यादित असते. एखाद्या भागीदाराने घेतलेल्या एका चुकीच्या निर्णयाचा फटका, यात असलेल्या सामूहिक जबाबदारीमुळे इतर सर्व भागीदारांना बसू शकतो. त्यामुळे पूर्ण व्यवसायच धोक्यात येण्याची शक्यता असते. व्यवसायाचे कर्ज व देणी वसूल करण्यासाठी भागीदाराच्या वैयक्तिक मालमत्तेवर टाच येण्याची शक्यता असते. मर्यादित भागीदारी व्यवसायामुळे … Read more

एकल कंपनी (One Person Company) म्हणजे काय? आणि त्याची वैशिष्ठ्ये काय?

एकल कंपनी

यापूर्वी आपण कंपनी म्हणजे काय? याची माहिती करून घेतली असून कंपन्यांचे विविध प्रकार पाहिले. कंपनी ही स्वतंत्र अस्तीत्व असलेली आणि कायद्याने निर्माण केलेली संस्था आहे हे आपल्याला माहिती आहेच. कंपनीतील सभासदांची संख्या, त्यांचे उत्तरदायित्व, विशेष हेतूने स्थापन झालेल्या कंपन्या, त्यावर नियंत्रण यावरून अनेक वेगवेगळे प्रकार आहेत. एखादा व्यवसाय व्यक्तीने करणे आणि कंपनीने करणे यात फरक … Read more

इनकम टॅक्स रिटर्न्स भरताना उत्पन्नातील प्रमाणित वजावट कशी घेता येते?

प्रमाणित वजावट

प्रमाणित वजावट ही अशी विशेष सवलत आहे की आपले करपात्र रक्कम ठरवण्यात येण्यापूर्वी या रकमेची वजावट आपणास एकूण उत्पन्नातून घेता येते. यासाठी कोणत्याही प्रकाराच्या खर्चाचा पुरावा मागितला जात नाही. सन २००४ पर्यंत काही प्रमाणात अशी सवलत पगारदार लोकांना त्यांच्या उत्पन्नच्या प्रमाणात मिळत होती. सन २००५-२००६ च्या अर्थसंकल्पात कररचनेत आमूलाग्र सुधारणा आणि करपात्र उत्पन्नाच्या मर्यादेत मोठया प्रमाणावर वाढ केल्याने ही सवलत रद्द करण्यात आली.

निफ्टीमध्ये इंडियाबुल्स हौसिंगच्या ठिकाणी नेस्लेचा समावेश करण्याची कारणे

निफ्टीमध्ये इंडियाबुल्स हौसिंगच्या ठिकाणी नेस्लेचा समावेश

निर्देशांक (lndex) म्हणजे काय? याची माहिती आपण यापूर्वीच करून घेतली आहे. मुंबई शेअरबाजारातील निवडक ३० शेअर्सवर आधारित सेन्सेक्स (Sensex) आणि राष्ट्रीय शेअरबाजारातील निवडक ५० शेअर्सवर आधारित निफ्टी (Nifty) हे सर्वाधिक लोकप्रिय निर्देशांक आहेत. अनेक म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही या निर्देशांकात समाविष्ट शेअर्समध्ये असते.

होमलोनवर कर्जदाराला व्याज देणारी जगातली एकमेव बँक माहित आहे का?

होमलोनवर कर्जदाराला व्याज देणारी जगातील एकमेव बँक

10 वर्षांसाठी गृहकर्ज घेतल्यास त्याबद्दल ग्राहकास अर्धा टक्क्याने व्याज देणाऱ्या बँकेची बातमी वाचली. अशा प्रकारे कर्ज देणारी आणि त्याबद्दल कर्जदारास व्याज देणारी ही जगातील एकमेव बँक आहे. ज्यसके बँक (Jyske bank) या डेन्मार्क मधील तिसऱ्या सर्वात मोठया बँकेने आपल्या कर्जदारांना -0.5% वार्षिक व्याजदराने 10 वर्ष मुदतीचे तारणसह गृहकर्ज देऊ केले आहे. ऋण व्याजदराने कर्ज याचा अर्थ असा होतो की असे कर्ज घेणाऱ्यास कर्जापोटी बँकेस मुद्दलापेक्षा कमी रकमेचा भरणा करावा लागेल.

हिंदू अविभाज्य कुटुंब (HUF) आणि करदेयता!!

हिंदू अविभाज्य कुटुंब

हिंदू अविभाज्य कुटुंब (HUF) स्वतंत्र अशी कायदेशीररित्या निर्माण करण्यात आलेली व्यक्ती असून आयकर कायदा 2(31) नुसार स्वतंत्र अधिकार आहेत. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती आणि परंपरागत पद्धतीने पिढीजात कौटुंबिक संपत्तीचे हस्तांतरण कुटुंबातील जेष्ठ पुत्राकडून त्याच्या जेष्ठ पुत्राकडे होत असे. जरी मालमत्ता त्याच्या नावावर असली आणि कुटुंबाच्या भल्यासाठी कोणतेही निर्णय घेण्याचा त्यास अधिकार असला तरी तो … Read more

आयकर भरण्याच्या नियमांबाबत महत्त्वाची माहिती वाचा या लेखात

Presumptive Tax Scheme

पगारदार व्यक्ती, नोंदणीकृत कंपन्या, खाजगी कंपन्या यांना काही गोष्टी सक्तीने कराव्या लागत असल्याने त्यांच्याद्वारे कर आपोआपच मिळतो. या उलट छोटे व्यावसायिक, सल्लागार, वाहतूक व्यवसाय करणारे लोक यांना मिळणारे उत्पन्न अनिश्चित असते. त्यांचा आयकर Presumptive Tax Scheme ने ठरला जातो.