जाणून घेऊ नाणेबाजार (Money Market ) बद्दल
वित्तीय बाजाराचे नाणेबाजार, भांडवल बाजार आणि विदेशी चलन बाजार हे महत्वाचे घटक आहेत. यांपैकी नाणेबाजार या घटकाची माहिती करून घेवूयात. सामन्यतः बाजार म्हटले की वस्तुची देवाण घेवाण होत असणारे मंडई सारखे ठिकाण डोळ्यासमोर येते. अर्थशास्त्राच्या दृष्टीने बाजार म्हणजे वस्तु आणि सेवा यांची देवाणघेवाण, यासाठी विशिष्ठ ठिकाण हवेच असे नाही.