प्रामाणिकपणे १ करोड किमतीचं लॉटरीचं तिकिट खऱ्या हकदाराला देणारे के. सुधाकरन
जी १० तिकिटे अशोकन ह्यांच्यासाठी बाजूला ठेवली होती त्यातल्याच एका तिकिटाने ही रक्कम जिंकली आहे. ह्याची सुतराम कल्पना अशोकन ह्यांना नव्हती कारण प्रत्यक्षात हा व्यवहार झाला नव्हता. अशोकन नी त्या तिकिटांचे पैसे सुधाकरन ह्यांना दिले नव्हते आणि सुधाकरन ह्यांनी कोणत्या नंबर ची तिकिटे बाजूला काढली आहेत हे अशोकन ह्यांना माहित नव्हतं. ह्यामुळे कायद्याच्या दृष्ट्रीने त्या तिकिटाचे खरे हकदार सुधाकरन हेच होते.