कुठे हरवले रोजच्या जगण्यातले चार्जिंग पॉईंट?
एके काळी प्रचंड मोठी कुटुंबं आणि तितकेच विविध चार्जिंग पॉइंट असायचे. काका, मामा, दादा, ताई असे किती तरी विविध चार्जिंग पॉइंट आपल्या घरात असायचे. त्याची कमी भासली तर जोडीला आपले मित्र मैत्रीण असायचे. पण काळाच्या स्पर्धेत आपण हे सगळेच मागे सोडून बसलो आहोत.