वाया गेलाय तो….

vaya-gela-to

अन्यायाविरूद्ध कायम वाचा फोडत राहणार तो,
शाहण्यांसारखे मूग गिळून गप्प बसणाऱ्यातला नाही तो,
ह्रुदयात माणुसकी ठेवून ताठ मानेने जगणारा आहे तो,
कारण… वाया गेलाय ना तो…!!

हा प्रवास सुखावह करेल तुमचा आशावाद…

aashavad

पाडगावकरांच्या काही ओळी आहेत, “चिऊताई, पहाटेच्या रंगांत तुझे घरटे न्हाले, तुला सांगायला फुलपाखरू धावत आले. तुझं दार बंद होतं, डोळे असून अंध होतं..” १००% च्या नादात आपलं तसंच तर होत नाही ना? असं होत असेल तर बदलायला हवं…… प्रवासाला निघाल्यानंतर इच्छित ठिकाणी पोहोचेपर्यंतचा प्रवास आपण सुखावह करण्याचा प्रयत्न करतो. प्रवासाचा आनंद घेतो. तसंच हे आहे. शेवटी, आपण सगळेच मुसाफिर आहोत. एका ध्येयापासून दुसऱ्या ध्येयापर्यंतचा प्रवास अविरत करणार आहोत. तो आनंददायक करायलाच हवा.

मेरी दोस्ती मेरा प्यार….

सुधीर कुमारचे पूर्ण नाव सुधीर शंकर सावंत.लालबाग मधील जुन्या हाजी कासम चाळीत रहायचा. लालबाग परळ या मुख्यत्वे गिरणी कामगार मोठ्या प्रमाणात राहत असलेल्या परीसरात सुधीर मोठा झाला. आई वडील आणि मोठी बहिण शोभा व लहान बहिण चित्रा असे चौकोनी कुटूंब.

पहिला पाऊस

first rain

पाऊस….. अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा संपून कधी एकदाचा पाऊस पडतो याची आपण वाट तर बघतो पण अचानक कधीतरी पहिला पाऊस पडतो तुमच्याकडे न छत्री असते ना रेनकोट….

डे ट्रेडिंग (Day Trading)

day-trading

या फाईल्सचा वापर स्टॉक निवडीसाठी आणि खरेदी / विक्री निर्णय घेण्यासाठी होतो. जर तुमचे स्टॉक सिलेक्शन सुयोग्य नसेल तर तुम्ही कितीही हुशार ट्रेडर असाल तरी फारसे काही करू शकणार नाही. यामध्ये ट्रिगर प्राईज काय असेल? आणि स्टोपलॉस किती असावा? हे ट्रेडरने आपल्याकडील पैसे, जोखीम घेण्याची तयारी आणि अनुभव यावरून स्वतः ठरवावे.

सेटल

Angad Bedi

त्याच्या आवडीची फक्त एकच गोष्ट राहीली होती ती म्हणजे व्यायाम, पण काल झालेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेमधील घटनेमुळे त्याच्यातला आत्मविश्वासच मरून गेला. त्याने जीमला पण जायचं बंद केलं. तो फक्त आता घरीच दंड बैठका मारायचा. त्याने कट्ट्यावर पण जाणं आता कमी केलं होतं. कॉलेज, Office आणि घर एव्हडच त्याचं रूटीन झालं होतं.

कावळे

कावळे आणि पिंड यांचे काहीतरी अजब रिलेशन आहे असे मला वाटते. एरवी नको तिथे दिसणारे आणि रस्त्यावरील घाणीतली घाण खाणारे हे कावळे नेमका पिंड ठेवला कि गायब होतात आणि जे काही दोनतीन डोक्यावर उडत असतील त्यांचा रुबाब तर काय वर्णावा….?

मार्च एंड – थकना मना है

march-end-thakana-mana-hai

२९ वर्षांचा “कुणाल” गेल्या पाच वर्षांपासून एका नामांकित कंपनी मध्ये एरिया सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याने त्याच्या हार्डवर्क आणि डेडिकेशन च्या जोरावर स्वतःची एक वेगळीच छाप कंपनीमध्ये पडली होती. कंपनीकडून मिळणारा बक्कळ पगार आणि सेल्स च्या जोरावर मिळणारा दाबून इन्सेन्टिव्ह, त्यामुळॆ कुणाल ची लाईफ एकदम व्यवस्थित चालली होती.

सांत्वन

marathi katha

“मी तर ऐकलय सगळ्या विमा पॉलीसी तिच्याच नावावर आहेत, सगळं घेऊन माहेरी पळून नाही गेली म्हणजे मिळवलं ” एकदा तर वाटलं सगळ्यांना जोरात ओरडून “चालते व्हा ” सांगावं….. पण मी तशीच गप्प बसून होते.

ट्रायल सब्जेक्ट्स

trial-subjects

कधीकाळी माझ्या लांबसडक केसांतून असाच हात फिरवायचा तो. एकेक बट घेऊन त्याच्या बोटांच्या फटीमधून सोडवायचा. आता त्याला कसं वाटतं असेल? एकदा वाटलं की त्याचा हात बाजूला घेऊन माझ्या हातात घट्ट पकडून ठेवावा पण तो करत होता ते आवडत ही होतं आणि हात उचलण्याइतके अंगात त्राण ही वाटत नव्हते. नजर फिरवून मी त्याच्याकडे पाहिलं, त्याच्या दुसऱ्या हाताने त्याने माझ्या डोळ्यातलं पाणी पुसलं.