हा आहे जगाशी हस्तांदोलन करणारा भारत
अवगुणांना ठळक करण्यापेक्षा आपल्याकडे जे चांगले गुण आणि कौशल्ये आहेत, ती अधोरेखित करून पुढे गेले पाहिजे, असे व्यक्तीमत्व विकासात म्हटले जाते. देशाच्या ‘व्यक्तीमत्व’ विकासातही आपल्यातील विसंगतीचा पाढा दररोज वाचण्यापेक्षा त्याची शक्तीस्थाने बळकट केली पाहिजेत. सध्याच्या मतमतांतरांच्या गदारोळात आपण आपल्या देशावर अन्याय तर करत नाही ना?