खर्च आणि बचत यांचा सुवर्णमध्य साधणारे आर्थिक नियोजन कसे असावे
असे म्हणतात की सर्वसामान्य, म्हणजेच मध्यमवर्गीय लोकं आपल्या इच्छा मारून जगत असतात. तडजोड या शब्दाशी जणू त्यांची गाठच बांधली गेलेली असते. अशी जी सर्वसामान्य लोकं असतात त्यांना त्यांच्या वाडवडीलांकडून वारसा हक्काने फार काही मिळालेले नसते.