दोनदा परवडत नसेल तर विकत घेऊ नका — हा एकच नियम तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो
दोनदा परवडत नसेल तर विकत घेऊ नका हा एकच नियम तुमची बचत वाढवू शकतो. जाणून घ्या या सोप्या पण शक्तिशाली आर्थिक नियमाबद्दल सविस्तर.
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
दोनदा परवडत नसेल तर विकत घेऊ नका हा एकच नियम तुमची बचत वाढवू शकतो. जाणून घ्या या सोप्या पण शक्तिशाली आर्थिक नियमाबद्दल सविस्तर.
‘पैसे वाचवणे’ ही एक रीत आहे.. पूर्वापार चालत आलेली.. आपले बाबा, आजोबा वेगवेगळ्या पद्धतीने पैसे वाचवायचे आणि चांगली संपत्ती वाढवायचे.. पण स्मार्ट सेव्हिंग्ज मात्र आई आणि आज्जी करायच्या नाही का?? स्वयंपाकघर धुंडाळलत तर हजारो रुपये मिळून जातील असे सेव्हिंग्ज..!! अक्कलहुषारीने त्या पैसे बाजूला टाकायच्या.. आणि अडीअडचणीला तेच कामी यायचे..