इराणमध्ये ‘चाबहार’ बंदर विकसित करणे भारतासाठी महत्त्वाचे का ठरले??
भारत इतकी गुंतवणूक चाबहार मध्ये का करतो आहे? असा प्रश्न सामान्य माणसांना पडणं सहाजिक आहे. फक्त चीनला शह द्यायला इतके पैसे? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. भारताने ‘चाबहार’ विकसित करताना एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. ‘चाबहार’ च्या बनण्याने अफगाणिस्तानला आता पाकिस्तान सोबत व्यापार करण्याची गरज संपली आहे.