तुमच्या पश्चात तुमच्या कुटुंबाला ही माहिती असायलाच हवी
आपल्यापैकी बरेच लोक वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक तर करतात, परंतु अचानक एखादे आजारपण उद्भवले आणि आपल्याला स्वतःला काही झाले तर काय ह्या गोष्टीसाठी ते तयार नसतात. असा पुढचा विचार करून ठेवणं त्यांना जमत नाही आणि मग खरंच दुर्दैवाने अशी काही परिस्थिति उद्भवली तर त्यांच्या कुटुंबियांची फरपट होते.