झेंडूची फुले, प्लास्टिक बंदी वगैरे, वगैरे..

प्लास्टिक बंदी

मी परग्रहाहून आल्यासारखा तो बघू लागला. नंतर त्याला काही जाणीव झाली असावी “लोकं प्लास्टिक पिशवीच मागतात काय करावं?” असे सांगून त्याने त्याच्यापुरता हा प्रश्न सोडवला आणि मला अनेक प्रश्न देऊन मोकळा झाला. शासनाने आदेश काढावे आपण त्याची खिल्ली करावी, चांगले आदेश धुळीस मिळवावे, वरून शासन काम करत नाही म्हणून ओरडावे.

Sometimes the problem is you!!

problem

आनंदी रहायला माणसाला शिकवावं लागतं का? जसं पक्ष्याला उडायला आणि माशाला पोहायला शिकवावं लागत नाही तसं भव्य स्वप्नं बघायला, दुसर्‍यांवर प्रेम करायला आणि जगाला भरभरुन आनंद वाटायला माणसाला शिकवावं लागत नाही.

गृहकर्ज घेण्याआधी या गोष्टी नक्की तपासून पहा..

गृहकर्ज

कर्ज मान्य करण्याआधीच ग्राहकाची, त्याच्या आर्थिक क्षमतेची चौकशी व पडताळणी बँकांकडून होते. कर्ज देणाऱ्या संस्थांचे कर्ज मान्य करण्याबद्दल काही नियम व अटी आहेत. ग्राहक जर या सर्व निकषांमध्ये बसत असेल तर त्याला कर्ज मंजूर व्हायला अडचणी येत नाहीत. गृहकर्ज घेण्यासाठी पात्र असण्याचे निकष संस्थेगणिक बदलत जातात. तरीही सर्व संस्थासाठी असलेले काही मुलभूत निकष काय ते आता आपण बघू.

Cattle Class म्हणून हिणवणाऱ्या ब्रिटिश स्त्रीला आपले कर्तृत्व दाखवणाऱ्या सुधा मूर्ती

सुधा मूर्ती

लंडन मध्ये एका हाय फाय स्त्री ने सलवार कमीज मध्ये असलेल्या सुधा मूर्ती ना ‘cattle class’ अस म्हंटल. तिच स्त्री नंतर सुधा मूर्तींचे लेक्चर ऐकण्यासाठी त्याच हॉल मध्ये बसली होती. कपड्यावरून माणसाची उंची ठरवणाऱ्या लोकांमध्ये ही सुधा मूर्ती ह्यांनी आपलं वेगळेपण आपल्या कर्तुत्वाने दाखवून दिलं. एकदा अमेरिका एकटीने फिरताना न्यू योर्क पोलिसांनी त्यांची रवानगी इटालियन ड्रग्सची तस्करी करणारी स्त्री समजून थेट ग्रँड केनीयन च्या तळाशी असणाऱ्या तुरुंगात केली.

love, लग्न, Divorce : आग का दरिया है, डूब के जाना है !

Divorce

असे कितीतरी आजी-आजोबा आपल्याला भेटतात आणि एकमेकांसोबत ते खूप छान दिसतात. intimacy हळूहळू निर्माण करावी लागते. ह्यासाठी दुसऱ्याच्या आवडी-निवडीबद्दल आदर, विचारांबद्दल आदर, आपल्यापेक्षा वेगळं असण्याचा स्वीकार, विश्वास असणे खूप गरजेचे असते. जेंव्हा पार्टनर म्हणून समान विचारांची, समान तत्वांची व्यक्ती निवडली जाते तेंव्हा intimacy लवकर निर्माण होऊ शकते. अर्थात, त्यासाठी पुन्हा कमीटमेंट असावीच लागते.

भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीला जन्म देणाऱ्या डॉक्टर इंदिरा हिंदुजा

स्त्रीचं बीज आणि पुरूषाचे शुक्राणू घेऊन त्याचं मिलन बाहेर केलं जाते. २-६ दिवस अतिशय नियंत्रित पद्धतीने त्याचं फलन झाल्यावर ते बीज स्त्री च्या युटेरस मध्ये सोडलं जाते. ह्या बीजापासून मग एक नवीन जीव स्त्रीच्या उदरात वाढू लागतो. आई – वडील होणाच्या सुखापासून वंचित राहिलेल्या अनेक जोडप्यांना हे सुख देणारी ही पद्धत १९७० ला सर रॉबर्ट एडवर्ड ह्यांनी विकसित केली. पण भारतात ही पद्धत विकसित करण्याचं श्रेय डॉक्टर इंदिरा हिंदुजा ह्यांना दिलं जातं.

दुर्गाशक्ती – पद्मश्री सुभासिनी मिस्त्री…

अतिशय गरीब कुटुंबात जन्म झालेल्या सुभासिनीच लग्न अवघ्या १२ व्या वर्षी झालं. १२ वर्ष संसार आणि ४ मुलं खांद्यावर असताना त्यांच्या नवऱ्याचा मृत्यू झाला. ह्या अकाली मृत्यूला कारण होतं ते म्हणजे वेळेवर न मिळालेले उपचार. अतिशय गरीब आणि पैसे नसल्याने वेळेवर नवऱ्याला हॉस्पिटल मध्ये प्रवेश न मिळाल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. त्याच क्षणी सुभासिनी मिस्त्री नी आपलं आयुष्याचं ध्येय निश्चित केलं ते म्हणजे आपण हॉस्पिटल काढायचं.

स्कायडायव्हिंग करणारी मराठमोळी मुलगी पद्मश्री शितल महाजन

शितल महाजन

६ जागतिक विक्रम, १९ राष्ट्रीय विक्रम आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित हे कर्तुत्व आहे पुण्याची असणारी मराठमोळी मुलगी शितल महाजनचं. शितल महाजनचा जन्म १९ सप्टेंबर १९८२ ला पुण्यात झाला. मूळचे गाव जळगाव असलेली शीतल ही बहिणाबाई चौधरी यांची पणती आहे. बहिणाबाई चौधरींचे नातू कमलाकर महाजन यांची सुकन्या.

यशस्वी होण्यासाठी आवश्यक पाच ‘न’ कार!

यशस्वी

विचार करा, एका चित्रपटातला नुसता डायलॉग हिरोच्या वागण्यात तडफ आणि खुमारी निर्माण करतो, तर ह्या तत्वाचं खर्‍याखुर्‍या आयुष्यात पालन केल्यास, आयुष्याचा पिक्चर किती सुपर डुपर हिट होईल?

दुर्गाशक्ती – भारतीय सैन्यातील पहिली स्त्री सैन्य अधिकारी प्रिया झिंगन

प्रिया झिंगन

प्रियाने थेट भारतीय सेनेचे तत्कालीन प्रमुख सुनिथ फ्रांसिस रॉड्रीक्स ह्यांना सरळ पत्र लिहून स्त्रियांसाठी भारतीय सेनेचे दरवाजे उघडण्यासाठी विनंती केली. भारतीय सेनेचा गणवेश अंगावर घालणं हे माझ्यासाठी गर्वाचा क्षण आहे. तो अनुभवण्याची संधी एक भारतीय नागरिक म्हणून मला मिळायला हवी असं तिने पत्रात लिहिलं होतं.