वायद्यांचे व्यवहार (Forward Transactions)
वायद्यांचे व्यवहार अर्थातच भावी व्यवहार हा एक भविष्यात होणाऱ्या व्यवहाराचा एक करार असतो . यातील खरेदीदार आणि विक्रेता , त्याना मान्य असलेल्या निश्चित अशा मालमत्तेची भविष्यातील किंमत कराराच्या दिवशी निश्चित करतात. यातील तरतुदीनुसार दोन्ही बाजूने करारातील अटींची पूर्तता करार पूर्ण करणाच्या दिवशी करावयाची असते.