सीरियामध्ये युद्धकाळात राहिलेली निडर युद्ध संवाददाता, ‘मेरी कोल्विन’

मेरी कोल्विन

‘मेरी कोल्विन’ जगातील एक अग्रगण्य वृत्तपत्र ‘द संडे टाईम्स’ मध्ये युद्ध संवाददाता म्हणून नोकरीला होती. मेरी प्रसिद्धीला आली ती १९८६ साली. लिबिया चे प्रमुख ‘मुआमार गद्दाफी’ ह्यांची मुलाखत घेणारी मेरी पहिली पत्रकार होती. ह्या मुलाखतीत गद्दाफी ह्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रेगन ह्यांना ‘मूर्ख, वेडा आणि इस्राईलचा कुत्रा म्हटलं होतं.

सैनिकी जीवनातले वास्तव सांगणारे ‘वालॉन्ग – एका युद्धकैद्याची बखर’

वालॉन्ग - एका युद्धकैद्याची बखर

दोन दिवसांपुर्वी एक पुस्तक वाचले, वालॉन्ग, अजुनही मी स्वतःला त्या पुस्तकाच्या हॅन्गओव्हरमधुन बाहेर काढु शकत नाहीये. इतका ह्या पुस्तकाने मनाचा ताबा घेतला आहे. लेफ्टनंट कर्नल श्यामकांत चव्हाण हे एकोणीसशे बासष्टमध्ये झालेल्या चीनविरुद्धच्या युद्धात तेव्हाच्या नेफा म्हणजे आताच्या अरुणाचल प्रदेशात भारतमातेची लाज राखण्यासाठी, आणि हिमालयाच्या शिखरांचं संरक्षण करण्यासाठी लढायला गेले होते.

कुठे हरवले रोजच्या जगण्यातले चार्जिंग पॉईंट?

चार्जिंग पॉईंट

एके काळी प्रचंड मोठी कुटुंबं आणि तितकेच विविध चार्जिंग पॉइंट असायचे. काका, मामा, दादा, ताई असे किती तरी विविध चार्जिंग पॉइंट आपल्या घरात असायचे. त्याची कमी भासली तर जोडीला आपले मित्र मैत्रीण असायचे. पण काळाच्या स्पर्धेत आपण हे सगळेच मागे सोडून बसलो आहोत.

Stress म्हणजे तणाव दूर करून रोजच्या जगण्यात उत्साह कसा आणावा?

तणाव

तणाव हा आपल्या एखाद्या वैयक्तिक कारणावरून असू शकतो, ऑफिस किंवा व्यावसायिक कारणामुळे असू शकतो किंवा अगदी एखादी डिस्टर्ब करणारी बातमी मिळाल्याने सुद्धा असू शकतो. कारण काही का असेना पण एवढं नक्की कि तणाव हि आपल्या मनाचीच एक अवस्था असते आणि केवळ आपणच त्याच्याशी मुकाबला करू शकतो.

गुंतवणूक करताना फसवणूक होऊ नये म्हणून हि काळजी आवर्जून घ्या.

गुंतवणूक करताना फसवणूक होऊ नये म्हणून हि काळजी आवर्जून घ्या.

भांडवल बाजाराबद्दल लोकांचे दोन टोकाचे गैरसमज आहेत. ते म्हणजे यातून भरपूर पैसे मिळतात किंवा यात लोक भिकेला लागतात. सर्वसाधारण काही न करता आपल्याला भरपूर पैसे मिळावेत अशी सुप्त इच्छा असलेल्या भरपूर व्यक्ती आहेत आणि त्यांच्या मानसिकतेचा फायदा घेणारे लोकही आहेत.

भविष्यात अवकाशात वस्ती करण्याची गरज का पडणार आहे?

अवकाशात वस्ती

आपलं विश्व हे अनेक गूढ, स्तिमित करणाऱ्या गोष्टींनी भरलेलं आहे. ज्यात असंख्य ग्रह, तारे, धुमकेतू, लघुग्रह, उपग्रह असं सगळचं सामावलेलं आहे. ह्यातील अनेक ग्रह, लघुग्रह ह्यावर मानवी वस्तीसाठी पोषक वातावरण नसलं तरी त्यावर असलेल्या वातावरणात, मूलद्रव्यात माणसाच्या मुलभूत गरजांना भागवण्याची क्षमता आहे. त्यामुळेच येत्या काळात अवकाश हेच आपलं भविष्य राहणार आहे.

॥कोंड॥ (एक घुसमट)

Marathi-katha

वरच्या माडीवर आभाळ न्याहाळत रुख्माक्का ऊभ्या होत्या. आषाढ सरला तरी पावसाचे नामोनिशाण कुठे नव्हते. आभाळ तर काठोकाठ भरून होतं. रोजचा दिवस पावसाची वाट बघत उगवायचा आणि आभाळाचा डोंब बघत मावळायचा. सारी सृष्टी स्तब्ध होती, झाडं, पानफुलं, माती आणि मातीत रूजलेल्या माणसांना आता एकच ओढ होती कोंड फुटण्याची.

अपंगत्त्वावर मात करून पॅरालिंपिक्समध्ये गोल्ड मेडल मिळवणारे पद्मश्री मुरलीकांत पेटकर

मुरलीकांत पेटकर

सप्टेंबर १९६५ चा काळ होता. भारत पाकिस्तान युद्धाला सुरवात झाली होती. अश्याच एका रात्री मुरलीकांत पेटकर सियालकोट इकडे आपल्या युनिटसह सकाळच्या साखर झोपेत होते. त्याचवेळी एका पाकिस्तानी सैनिकाने त्यांच्या युनिटवर अंधाधुंद गोळीबार सुरु केला. काय होते आहे कळायच्या आत सगळीकडे अफरातफरी माजली.

आकाशाकडे बघताना (भाग-१)

ओरायन

रात्रीच्या अंधारात आकाशाकडे बघितलं की अनेक तारे लुकलुकताना आपल्याला दिसतात. शहराच्या रोषणाईमध्ये तसं आकाश आपल्याशी कमीच बोलतं पण कधी गावाला गेल्यावर अथवा कधी वीज गेलेली असताना पूर्ण अंधारात ताऱ्यांचा जो सडा आपल्या समोर उभा राहतो, तो आपल्याला आपण ह्या विश्वाचा किती छोटा भाग आहोत ह्याची जाणीव करून देणारा असतो.