भारतीय सेना आणि वैज्ञानिक यांनी अमेरिकेच्या सी.आय.ए ला पाजलेला अपयशाचा डोस.

वैज्ञानिक

एक क्षणभर सुद्धा अमेरिकेला भारताच्या ह्या चाचण्यांचा सुगावा लागला नाही. ह्याचे सर्वात मोठे श्रेय हे भारतीय सेनेला जाते. ज्यांनी अमेरिकेच्या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास करून भारतीय संशोधक आणि वैज्ञानिकांना त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत केली. आज ह्या गोष्टीला २० वर्षाचा काळ लोटला पण त्या हसलेल्या बुद्धाचा चेहरा न अमेरिका विसरू शकली आहे न अमेरिकेची गुप्तचर संघटना सी.आय.ए.

‘जांभळ्या स्तनांचा तालिबानी संदेश’ कवी दिनकर मनवर यांच्या कवितेवरील निर्बुद्ध गदारोळ

दिनकर मनवर

जवळपास ५० ओळींच्या या कवितेत कविॅनी समाजासमोर आजच्या वर्तमानातलं दाहक वास्तव मांडलं आहे. “किंवा अदिवासी पोरींच्या स्तनांसारखं जांभळं” या पाच शब्दांच्या ओळीकडे सर्वांचं लक्ष गेल. त्यातही या ओळीतील पाच शब्दांमधील ‘स्तन’ ह्याच शब्दाकडे जास्त लक्ष गेलं असण्याचीच शक्यता जास्त आणि मग पुढचं सगळं घडलं असावं.

मृत्यूपत्र आणि त्यात कोणत्या मालमत्तेची वाटणी होऊ शकत नाही?

मृत्यूपत्र

मृत्यूपत्र म्हणजे मृत्यूपश्चात आपल्या मालमत्तेची विभागणी करण्यासंबंधीचा दस्तावेज. मृत्यूपत्र तयार करण हे सक्तीचं नसलं तरी गरजेचं मात्र आहे. मृत्यूपत्र करताना कायदेशीर बाबींच्या पूर्ततेपेक्षाही कठीण काम असतं ते मालमत्तेचं वर्गीकरण आणि विभाजन. सगळ्या मालमत्ता मृत्यूपत्रामध्ये नमूद करता येत नाहीत.

फर्श से अर्श तक – MDH मसाले (एक प्रेरणादायी जीवनप्रवास)

MDH

वर्ल्ड पॉप्युलेशन क्लॉक सांगतं कि या पृथ्वीतलावर या घडीला साधारण ७.७ बिलियन लोक राहतात. यात सर्वांचाच रोजच्या जगण्यात आपापल्या पातळीवर संघर्ष चालू असतो. पाहायला गेलं तर पत्येक जण आयुष्यात एक युद्धच खेळत जातो. मात्र तो योद्धा जर सगळ्या परिस्थीला तोंड देऊन विजयी होऊन उभा राहिला तर तो सर्वांसमोर एक उदाहरण बनून जातो…

स्व संमोहन : एक वरदान!

स्व संमोहन

मित्रांनो, लॉ ऑफ अट्रॅक्शन वापरताना आपल्याला अंतर्मनाशी संवाद साधावा लागतो, स्व संमोहन करून. माणसाला पाच ज्ञानेंद्रिये आहेत. त्या पाच ज्ञानेंद्रियांचा वापर करुन आपण अंतर्मनाला माहिती पुरवत असतो, जसं की आपण काल्पनिक पैशाला पाहतो, नोटांना स्पर्श करतो, नाण्यांचा आणि नोटांचा आवाज ऐकतो, करकरीत नोटांचा सुगंध घेतो!

एक भेट: लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा – अत्युच्च समाधान…

लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा

बाबा आमटे ह्यांच्या महारोगी सेवा समिती ह्या संस्थेने चालू केलेला लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा इथे. डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे तसेच इथल्या अनेक लोकांच्या परिश्रमातून बाबा आमटेंनी लावलेल्या एका छोट्या रोपट्याचं एका वटवृक्षात रुपांतर झालं आहे. आजही त्याच सेवाधार्मातून इथल्या आदिवासी समाजासाठी पूर्ण आमटे कुटुंब कार्यरत आहे.

का अडकला आहे राज कुंद्रा? ए_रॉटीक फिल्म आणि पो_र्न फिल्ममध्ये काय फरक आहे?

राज कुंद्रा न्यूज़ शिल्पा शेट्टी गहना वशिष्ठ पूनम पांडे

गेल्या काही दिवसांपासून राज कुंद्रा हे नाव चर्चेत आहे. राज कुंद्राला आक्षेपार्ह सिनेमे किंवा कंटेंट बनवण्यामुळे अटक झाली आहे. तो सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्याविरुद्ध सज्जड पुरावे सापडले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

समृद्धी बरोबरच आयुष्यात सुख येते हे खरे आहे का?

समृद्धी

आयुष्यात जेव्हा मुबलक पैसा उपलब्ध होऊ लागतो, तेव्हा कसल्याही बर्‍या वाईट प्रसंगाना माणुस आत्मविश्वासाने सामोरा जातो, साहजिकच तो स्वतःवर प्रेम करु लागतो आणि दिवसातला बहुतांश वेळ आनंदी असतो.

रागातल्या ऊर्जेचा सकारात्मक वापर कसा करावा?

राग

राग ही एक उर्जा आहे, आपल्यालाही राग येतो आणि असामान्य लोकांनाही राग येतो, पण ते लोक आपल्या रागातुन निर्माण झालेल्या उर्जा व्यर्थ घालवत नाहीत, तिचा सकारात्मक वापर करुन विश्व बदलुन टाकतात. गांधीजींना जेव्हा रेल्वेतुन बाहेर फेकुन दिलं तेव्हा त्यांना प्रचंड राग आला, इतका की त्यांनी ना ना खटपटी करुन इंग्रजांनाच देशाबाहेर हाकलुन लावलं!

तुमचा पैसा सुरक्षित आहे का? प्रोप्रायटरी ट्रेडिंग बद्दलची हि माहिती असू द्या.

प्रॉपायटरी ट्रेडींग

ब्रोकरेज फर्मने स्वतः साठी केलेले खाजगी ट्रेडींग  म्हणजे प्रोप्रायटरी ट्रेडिंग होय. याचा थोडक्यात उल्लेख ‘प्रो ट्रेडींग’ असाही करतात. ज्यांना हे जमले त्यांनी किरकोळ व्यवसाय बंद करून कॉर्पोरेटसाठी आणि स्वतःसाठी प्रोप्रायटरी ट्रेडिंग फर्म स्थापन केल्या तर काहींनी किरकोळ व्यवसायासपूरक म्हणून प्रो ट्रेडिंग चालू केले. मोठया प्रमाणात नफा मिळवण्यासाठी हे अपरिहार्य झाले आहे.