मराठी मालिका

malika

रात्रीचे दोन वाजलेत माझा दारावरची बेल वाजली म्हणून मी घाईत दरवाजा उघडला तर समोर विक्रम उभा. अर्थात स्वारी फुल होती ते सांगायलाच नको. “बायको घरात घेत नाही म्हणून तुझ्याकडे आलो. बाहेर झोपतो सकाळी जाईन.” असे म्हणत आत शिरला.

दूत

dut

“फार काम नाही राहिले इथे. सिरीयस लोक येतात पण अत्यानुधिक उपकरणे. मनापासून मेहनत करणारे डॉक्टर्स आणि नवीन औषधे यामुळे बऱ्याचदा माणूस वाचतोच. त्यामुळे घेऊन जायला फारच कमी माणसे असतात. काल तर मोजून दोन जण सापडले त्यातही एक म्हातारा…. कितीतरी दिवस त्याचे नातेवाईक विनवणी करत होते घेऊन जा घेऊन जा..

सैनिक

sainik

“काय बोलायचे …..??? पहिल्याने शांतपणे विचारले. ह्या एसीबद्दल बोलू. राजस्थानमधील वाळवंटात ४६℃ हातात ऐ. के. ४७ घेऊन दोन दोन दिवस उभा राहिलोय मी… ह्यापेक्षा भीषण गर्मी तुम्ही अनुभवली आहे का…. ??? मी नुकताच सियाचेनमधून येतोय. तीन महिने सीमेच्या रक्षणासाठी होतो तिथे. उणे १५℃ वातावरण होते. चहूकडे बर्फच बर्फ. हरवून जाऊ नये म्हणून एकमेकांच्या कमरेला दोरी बांधून होतो. समुद्रसपाटीपासून दहा हजार फूट बर्फात उभे होतो.

जितकी मोठी स्वप्ने, तितके मोठे यश!… (प्रेरणादायी)

Dream-Big

जिम केरी एका सफाई कर्मचार्‍याचा मुलगा होता, तो एका अतिशय गरीब घरात जन्मला होता, भाड्याच्या घरात राहण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नसायचे, म्हणुन किराया देऊन एका खटारा कार मध्ये राहायचा. पोटभर खायची भ्रांत असायची, पण अशा बिकट परिस्थीतीतही त्याने एक भव्य स्वप्न पाहीले, हॉलीवुड एक्टर बनण्याचे स्वप्न.

गण्याची युक्ती…..

manache-talks

काल तर भाजी आणताना एका बाईन दुसऱ्या बाईला हा गंगीचा नवरा म्हणून माझी वळख करून दिली. आता तूच इचार कर मी जर पॉश नाही राहिलो तर तुला खाली मान घालावी लागलं का न्हाय? गण्याच्या या प्रश्नाने गंगी काय समजायचं ते समजली. ती काय बी बोलली नाय. तिला गण्याचं लक्षण मात्र ठीक दिसलं नाय.
त्यातच एक दिस शेजारची कमळी तिच्या घरी आली.

Target पूर्ण का होत नाही …..?

Target Marathi Humar

“इतकेच नव्हे साहेब…. तर जुने काही भयानक आजार नष्टच झाले आहेत. त्यावर तर जन्माला आल्याबरोबरच औषध निघाली आहेत. शिवाय आपण नवनवीन रोग काढले तर त्यावरही उपाय निघाले आहेत. हल्ली तर जुने अवयव काढून त्याजागी नवीन अवयव ही बसविता येतात”.

श्रद्धा

shrdhha

“चार ते पाच तास रांगेत उभे राहून… गणपतीच्या समोर गेल्यावर चार सेकंद ही समोर उभे राहू शकत नाही. डोळे भरून त्याला पाहू शकत नाही. उलट धक्के खाऊन बाहेर पडावे लागते. त्या देवाचे दर्शन घेण्यात काय अर्थ आहे…..? मी हा प्रश्न विक्रमला विचारला. तर त्याने “तुझे काय जाते रे भाऊ ….?? देवाचे दर्शन घेणे ही तुझी संकल्पना वेगळी आहे तशीच प्रत्येकाची असावी का…. ??

भूतकाळातील विश्व…

G.M.R.T

विश्वाची उत्पत्ती साधारण १३.८ बिलियन वर्षापूर्वी झाली असे मानलं जाते. म्हणजेच विश्वाच्या उत्पत्तीचं अगदी सुरवातीचं स्वरूप आपण ह्या रेडीओ आकाशगंगेच्या रूपाने बघू शकलो आहोत. विश्व निर्मितीच्या वेळी असलेल्या रुपात अश्या आकाशगंगेचं असण हेच वैज्ञानिक आणि संशोधक ह्यांच्यासाठी कुतूहल वाढवणारं आहे.

आठवणीतला श्रावण

shravan

पूर्वी शाळा, म्हणजे आंतरराष्ट्रीय होण्या पूर्वी अर्ध्या दिवसाची असायची (ग्रामीण भागात अजूनही राहते) त्यामुळॆ मला श्रावण सोमवारचे विशेष आकर्षण असायचे. नागपंचमी, मंगळागौर, राखीपौर्णिमा, गोपाळकाला व शेवटी पोळा असे एक एक सण म्हणजे आनंदाची मेजवानी. नागपंचमीला आम्ही नागाचे वारूळ शोधून त्याची पूजा करयचो अर्थात खाली वारुळाची.

हिटलर

hitlar

“आहो कमीतकमी एकहाती निर्णय तरी घेईल. एखादा कायदा आणला तर त्यावर वाद … चर्चा …. खटला तर भरणार नाही. आता नवीन गाड्या घेताना काही अटी ठेवल्या तर?? भरमसाठ गाड्या रस्त्यावर येणार नाहीत. सरकारी वाहतूक नफा तोट्याची पर्वा न करता चालवली तर ?? भीतीने का होईना लोक सरकारी गाड्यातून प्रवास करतील. शाळेचा दर्जा सगळीकडे एकच ठेवला … एकच पद्धती वापरली …एकच बोर्ड आणले तर ….??