बोनस शेअर्स आणि करदेयता
बोनस शेअर्स म्हणजे कंपनीने त्यांच्या भागधारकांना दिलेली विनामूल्य भेट. यासाठी अट एवढीच की बोनस शेअर देण्याच्या तारखेला तुम्ही त्या कंपनीचे भागधारक असणे जरुरीचे आहे. याकरिता कोणतेही मूल्य आकारले जात नाही. फायद्यातून लाभांशाचे (Dividend) वितरण केल्यावरही काही रक्कम कंपनीच्या गंगाजळीत (Reserve) शिल्लक राहते.