सुवर्ण संचय योजना

gold-manachetalks

भारत देशात सोने ही एक प्रतिष्ठेची बाब आहे. कोणतेही मंगल कार्य सोन्याशिवाय अपूर्ण मानले जाते. सोने खरेदी करणे म्हणजे उत्तम गुंतवणूक हे समीकरण आजही सर्वसामान्य भारतीय माणसाच्या मनात पक्के आहे. अजूनही ग्रामीण भागात शेतमालाचे पैसे आल्यावर सोन्यातच गुंतवणूक करण्यास प्राधान्य दिले जाते. किंवा घरात मुलीचा जन्म झाल्यास सर्वसाधारण भारतीय माणूस तिच्या लहानपणापासूनच थोडे थोडे सोने खरेदी करायला सुरवात करतो.

आपण कमावलेला पैसा कामाला लागावा यासाठीच्या काही गुंतवणूक योजना वाचा या लेखात

Investment Marathi

व्यक्ती तितक्या प्रकृती या नात्याने विविध गुंतवणूकदार किफायतशीर गुंतवणुकीचे विविध पर्याय शोधत असतात. काही योजना अल्प गुंतवणूक असलेल्या असतात तर मोठ्या गुंतवणुकीच्या काही योजना किमान गुंतवणुकीसाठी खर्चिक ठरतात. या योजनांचा संबंध मोजक्याच लोकांशी येत असल्याने त्या फारशा प्रचलित नाहीत.

पैशाचा उड्डाणपूल बांधूया

Stock Exchange

तेच पैसे फक्त आय.पी.ओ. म्हणजे नव्या कंपन्यांच्या निर्धोक गुंतवणुकीत टाकले असते  तर….समजा गुंतवणुकीची सुरुवात जानेवारी महिन्यापासून केली असती तर डिसेंबरपर्यंत प्रत्येक गुंतवणुकीवर चाळीस टक्क्याचा नफा झाला असता. म्हणजे एक वर्षात एका लाखाचे कमीतकमी दोन लाख झाले असते. आणि आपले पैसे आपल्याच ताब्यात राहिले असते.

नियोजित दीर्घकालीन नफा मोजणी (LTCG) आणि करआकारणी

LTCG

येणार येणार म्हणून गेले चार अर्थसंकल्प सर्वांना हुलकावणी देणारा बहुचर्चित LTCG म्हणजेच शेअरवरील दीर्घकालीन नफा आता काही अटीसह करपात्र ठरला आहे. याआधी तो आयकर कलम १०(३८) नुसार करमुक्त होता. यावरील सर्वसाधारण टोकाची प्रतिक्रिया म्हणून बाजारात मोठी पडझड झाली. याबाबतीतील प्रस्तावित तरतुदी आणि त्याचे गुंतवणूकदारांवर होणारे परिणाम जाणून घेवू या.

संभाव्य आर्थिक संकटे आणि त्यांना तोंड देण्यासाठी करता येण्यासारखी तरतूद

आर्थिक संकटांना तोंड कसे द्यावे

अचानक येतात ती संकटे, त्यांच्याशी सामना करण्यास आपण कमी पडलो तर आपले नुकसान होते. संपूर्ण आर्थिक घडी विस्कळते. काहीजण यासाठी सज्ज असतात पण बरेच लोक गाफिल असतात. व्यवसाय अथवा नोकरी करीत असताना टर्म इन्शुरेन्स, आक्सिडेंट इन्शुरेन्स आणि मेडिक्लेम असला पाहिजे या संबंधी बऱ्यापैकी प्रसार आणि प्रचार होत असला तरी यास प्राधान्य देणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी आहे

गृहखरेदी करण्याआधी या प्राथमिक बाबी नक्की तपासून बघा!!

Buying House

एकदा आपण आपली स्थावर मालमत्ता म्हणजे घर घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करतो तेव्हा बिल्डरच्या पेपरवर्कची आधी तपासणी करा, कामासाठी प्रारंभिक प्रमाणपत्र, पर्यावरण मंजुरी आणि मान्यताप्राप्त इमारत योजना याची एक जागरूक ग्राहक म्हणून खात्री करून घ्या.

भारतातील गुंतवणूकदारांचे प्रकार कोणते आणि आपण त्यातील कोण?

Choosing Broker

येथे भाग घेणारी प्रत्येक व्यक्ति वेगळी आहे त्याच्या गरजा, गुंतवणुक करण्याची क्षमता आणि मुख्य म्हणजे त्याची मानसिकता वेगवेगळी आहे या सर्वांचा एकत्रित सामूहिक परिणाम हा बाजारातल्या किंमतीवर होत असतो. बाजारात  आपणास किंमत दिसत असते परंतू त्याचे मूल्य शोधून नफा मिळवणे ही येथे येणाऱ्या व्यक्तीगत अथवा संस्थात्मक गुंतवणूकदाराची इच्छा असते.