कोण आहे वंशवादाचा बळी ठरलेली प्रियंका योशिकावा
६ सप्टेंबर २०१६ ला ‘मिस जपान’ चा किताब मिळवणारी प्रियांका वंशवादाची शिकार होत जपानमध्ये लहानाची मोठी झाली. वंशवाद किंवा racism म्हणजे एका वंशाच्या लोकांकडून दुसऱ्या वंशाच्या लोकांबरोबर भेदभाव केला जाणं. जगभर चालणाऱ्या या वंशवादाला प्रियंकाला तोंड द्यावं लागलं याचं कारणही काहीसं वेगळंच होतं.