‘हे २० घरगुती उपाय करा’ आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवा
केवळ डॉक्टरांनी सांगितलेली औषधच आपल्याला आजारांपासून दूर ठेवतात असं नाही, तर काही घरगुती उपायसुद्धा फार औषधोपचार न करता आपल्याला आजारातून मुक्त करून तंदुरूस्त ठेवतात
अफवा नाही मनाचेTalks पसरवा
केवळ डॉक्टरांनी सांगितलेली औषधच आपल्याला आजारांपासून दूर ठेवतात असं नाही, तर काही घरगुती उपायसुद्धा फार औषधोपचार न करता आपल्याला आजारातून मुक्त करून तंदुरूस्त ठेवतात
वजन जास्त प्रमाणात वाढल्याने मधुमेह, रक्तदाब, पर्यायाने हृदयविकार या विकारांची भीती अधिक प्रमाणात वाढते. याशिवाय कर्करोग आणि अतिरिक्त वजन याचा नजीकचा संबंध असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. कर्करोगामुळे मरण पावलेल्या रुग्णांपैकी १४ टक्के पुरुष आणि २० टक्के स्त्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक वजन असलेल्या होत्या असे एका पाहणीत आढळून आले आहे.
केसांच्या समस्या जसे की केस गळती, केस लवकर पांढरे होणे यावर घरोघरी माहीत असलेला हमखास उपाय म्हणजे महाभृंगराज किंवा भृंगराज तेल. आयुर्वेदात सुद्धा केसांच्या अनेक समस्यांवर महाभृंगराज तेल सुचवले जाते.
वजन नियंत्रणात ठेवणे.. या वाक्याचे दोन वेगळ्या व्यक्तींसाठी दोन वेगळे अर्थ असू शकतात. काहींना वजन आटोक्यात आणण्यासाठी जास्तीचे वाढलेले वजन कमी करण्याची गरज असते, तर काहींचे वजन त्यांच्या उंचीच्या मानाने खूपच कमी असते. जसे अति वाढलेले वजन हे तब्येतीसाठी चांगले नसते त्याचप्रमाणे जर वजन हवे त्यापेक्षा खूपच कमी असेल तरी तब्येतीच्या तक्रारी सुरु होतात.
या लेखात मधुमेह म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते असतात आणि साखर, मध या पदार्थांचा मधुमेहींच्या शरीरावर कसा परिणाम होतो आणि मधुमेहींनी मधाचा वापर कसा करावा याबद्दल सगळी माहिती सोप्या शब्दात सांगितली आहे.
आपल्या घरात जेवणानंतर बडीशेप खायची पद्धत आहे. असे म्हणतात की जेवणानंतर बडीशेप खाल्ल्याने जेवण पचायला मदत होते. बडीशेपेच्या अनेक फायद्यांपैकी हा एक महत्वाचा फायदा आहेच प या व्यतिरिक्त सुद्धा बडीशेपेचे इतर अनेक फायदे आहेत. बडीशेप अत्यंत औषधी आहे. बडीशेपेमध्ये व्हिटामिन जास्त प्रमाणात आढळतात, खास करून व्हिटामिन ‘सी’, ‘ई’ आणि ‘के’.
मागील अनेक वर्षांपासून पुरुषांमधील वंध्यत्वाचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत गुणसूत्रांना प्रत्येक गोष्टीसाठी जबाबदार धरता येत नाही. मद्यपान आणि धूम्रपानासारख्या त्रासदायक सवयींनाही त्यासाठी सर्रास दोष दिला जातो. ते योग्यच आहे. ‘या’ सहा पदार्थांमुळे पुरुषांमध्ये वाढत आहे वंध्यत्वाची समस्या
बऱ्याचदा आजारपणात किंवा आजारपणातून उठल्यावर सुद्धा काही दिवस तोंडाची चव जाते. यामुळे खायची इच्छा उरत नाही. भूक लागत नाही. भूक लागत नसल्यास लेखात सांगितलेले उपाय करा
शिकेकाईचे फायदे वाचल्यानंतर तुम्ही सुद्धा ती वापरून बघायला उत्सुक असाल, हो ना? मग हा लेख शेवटपर्यंत वाचा. शिकेकाईचा उपयोग करण्याच्या पद्धती जाणून घेण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे शिकेकाई ही आपल्या केसांच्या आरोग्यासाठी इतर केमिकल शाम्पू पेक्षा केव्हाही चांगला पर्याय आहे. पण इतर शाम्पूचा जसा फेस होतो तितका शिकेकाईचा होत नाही.
जगभर आपल्या भडक लाल रंगासाठी प्रसिद्ध असणारे बीट खाल्ले जाते. पदार्थामध्ये नैसर्गिक लाल रंगासाठी तर बीट वापरतातच पण त्याचबरोबर बीटाची विशिष्ट चव सुद्धा अनेकांना आवडते. बीटचा सगळ्यात प्रसिद्ध पदार्थ म्हणजे कटलेट.