अपघातात पाय गमावून घडत गेलेली ती फुलराणी ‘मानसी जोशी’
२ डिसेंबर २०११ ला ऑफिस ला जाताना तिच्या स्कुटर ला एका वेगाने येणाऱ्या ट्रक ने धडक दिली. होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागला नाही. हॉस्पिटल मध्ये नेईपर्यंत पायातुन खूप रक्तस्त्राव झाला होता. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण मानसी चा पाय वाचवू शकले नाहीत. मानसी ला वाचवण्यासाठी तिचा एक पाय शरीरापासुन वेगळा करावा लागला.