सुप्त मन आणि त्याची शक्ती वापरून आरोग्य कसे सुधारता येईल?

सुप्त मन

तर हे सिद्ध झाले आहे की, आपल्या शरीरातल्या आंतरिक क्रियांवरही सुप्त मनाची सत्ता चालते. जसं की, समोर मातीचे कण उडाले की सेकंदाच्या दहाव्या भागात लगेच पापण्या मिटतात. सुप्त मन शक्तीशाली आहे पण एखाद्या सेनापतीसारखं, त्याच्यावर सत्ता चालते विचारांची!

ओल्या नारळापासून खोबरेल तेल बनवण्याची घरगुती पद्धत

संपूर्ण भारतात विविध कारणांनी नारळाचे तेल लोकप्रिय आहे. ते खाद्यतेल म्हणून वापरले जाते, सहजपणे उपलब्ध होते आणि त्याचे अनेकानेक उपयोग आहेत. आपल्या संस्कृतीत सण, उत्सवांची रेलचेल असतेच. ओलं नारळ प्रत्येक उत्सवात मानाचं स्थान घेऊन असतंच असतं. या ओल्या नारळापासून Coconut Oil खोबरेल तेल कसे बनवता येते त्याची कृती आज आपण बघू. ओल्या नारळापासून Coconut Oil … Read more

घरगुती व्यवहार चोख होण्यासाठी मासिक बजेट कसे तयार करावे?

मासिक बजेट

काही वर्षांपूर्वी जेव्हा मी माझे पहिले मासिक बजेट तयार केले होते तेव्हा फक्त दरवर्षी किती रक्कम मी मिळवतो हे साधारणपणे माहिती होते. परंतु माझ्या खर्चाचा व गुंतवणुकीचा ताळमेळ काही उत्पन्नाशी बसत नव्हता. थोडक्यात पैसे खर्च करताना मी आपल्याला परवडते की नाही याचा विचार न करता केवळ खर्चच करत होतो. आर्थिक चणचण आणि क्रेडिट कार्ड चे पठाणी व्याज तसेच दंड भरावा लागल्यावर मी जागा झालो आणि माझे पहिले बजेट मांडले.

मनोगत ज्याचं त्याचं….

मनोगत

बरे झाले…. उद्या एकदाचा जाईल तो. दरवर्षी कमीतकमी पाच दिवस खूप ताप असतो डोक्याला. ही कोकणातील लोक त्याच्यासाठी बिनपगारी रजा घेतील पण गावी जाणारंच. आज इतकी वर्षे हा उद्योग संभाळतोय पण यांच्यावर कंट्रोल नाही करू शकलो मी. या दिवसात किती ओव्हरटाईम होतात… अनुपस्थिती आहेच. नुकसान होतेच.

दुसरे जग – कथा

कथा

रात्रीचे दोन वाजले होते. तो खाली उतरताच भुंकणारी कुत्री अचानक शांत झाली होती. तो हसला. च्यायला…. ह्यांना बरोबर कळते कोण सज्जन आणि कोण वाईट आहे ते. पण ती कुत्री लांब उभी राहून परत भुंकू लागली. हे जरा जास्त धोकादायक आहे असे मनात म्हणत त्याने हातात काठी घेतली. आजूबाजूला भयाण काळोख पसरला होता. इथेच झोपायचे की चालत जायचे याचा विचार करू लागला.

(ELSS ) समभाग संलग्न बचत योजना की (ULIP) युनिट संलग्न विमा योजना

ELSS

आज युनिट संलग्न विमा योजना (ULIP) या गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांच्या दृष्टिकोनातून कधीच खूप मागे पडल्या आहेत. सुरवातीच्या काळात त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नासंबंधी अवास्तव दावे केले गेले आणि बाजारातील तेजीमुळे ते पूर्णही झाले परंतू 2008 मधील मंदीमुळे ते किती पोकळ आहेत याची जाणीव लोकांना झाली.

आयुष्यावर निखळ प्रेम करायला शिकवणारा ‘ब्लु क्रश!’

ब्लु क्रश

निर्भयपणे आव्हानांना सामोरे गेलं की आधी उपहास आणि विरोध करणारं जग, थक्क होवुन किनार्‍यावर जमा होतं, शिट्या आरोळ्या देऊन आपल्या विजयात सामील होतं, असा वेगळाच संदेश देणारा ‘ब्लु क्रश!’ मैत्री कशी करावी, मैत्री कशी निभवावीे, मैत्रीचा नव्याने अर्थ शिकवणारा, ‘ब्लु क्रश’! इतरांचं स्वप्नं पुर्ण केल्यास, आपसुक आपलंही इप्सित साध्य होतं, हे महान रहस्य ठळकपणे मांडणारा ‘ब्लु क्रश’!

आपण चवीने खातो ते व्हॅनिला आईस्क्रीम नक्की आहे तरी काय?

व्हॅनिला हे जगातल्या सगळ्यात महाग मसाल्यांपैकी एक आहे. किलोला ४२ हजार असा भाव असलेलं हे व्हॅनिला प्रेशिअस मेटल्सला सुद्धा मागे टाकतं. केशरानन्तर सर्वात महाग असलेला मसाला जर कुठला असे तर तो आहे व्हॅनिला.

जागृत मन आणि सुप्त मन यांची शक्ती वापरून यशस्वी होण्याचं तंत्र…

जागृत मन आणि सुप्त मन

आपल्या मनाचे दोन भाग आहेत, जागृत मन आणि सुप्त मन. जागृत मन रेल्वेच्या इंजिनासारखं आहे, मागे जोडलेले धुड म्हणजे सुप्त मन. जागृत मनाकडे उत्तम निर्णय क्षमता आहे, पण ते विसरभोळं आहे. सुप्त मनाला स्वतःची विचारशक्ती, विवेकबुद्धी नाही, पण ते अफाट शक्तीशाली आहे. त्याच्यावर कोरलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याची अफलातुन शक्ती त्याला प्राप्त आहे.

मृत्युपत्राविषयी कायदेशीर बाबी व त्याची पूर्तता (Legal-Aspects-of-A-Will)

मृत्युपत्राविषयी कायदेशीर बाबी

मृत्यूपत्र म्हणजे व्यक्तीने त्याच्या पश्चात त्याच्या मालमत्तेच्या वाटपासंदर्भात केलेला कायदेशीर दस्तऐवज. भारतीय वारसा कायदा, १९२५, सेक्शन २ (ह) अन्वये ‘‘मृत्यूपत्र म्हणजे मृत्यूपत्र करणार्‍याने त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेची विल्हेवाट कशी लावावी यासंबंधीची कायदेशीर रितीने घोषित केलेली इच्छा होय.’’