प्रेम हे!…. (Power of Love)

power of love

पण माणसाची आणखी एक खुप खोल गरज आहे, अगदी ऑक्सीजन सारखी आवश्यक, आणि ती म्हणजे ‘प्रेम’! प्रेमाला वजा करा, लहान-मोठा, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष कोणत्याही माणसाला जगायला प्रेमाची गरज असते, आणि अगदी जीवनाच्या सुरुवातीपासुन त्याला प्रेम हवं असतं!

बेनामी मालमत्तेची माहिती द्या आणि रु.५ करोड पर्यंत बक्षीस जिंका

income tax informant reward scheme

पूर्वी टीव्हीवर ‘आपण यांना पाहिलत का?’ नावाचा एक प्रोग्रॅम लागायचा. यामध्ये हरवलेल्या व्यक्तींचे नाव व वर्णनासहीत  फोटो दाखवण्यात यायचे. क्वचितप्रसंगी शोधून देणाऱ्यास ईनामही (बक्षीस) जाहीर केले जात असे. आजही अनेक वर्तमानपत्रांमध्ये अशाप्रकारचे कॉलम बघायला मिळतात. रस्ता, बसस्टॉप, रेल्वेस्टेशन अशा अनेक ठिकाणी आजही अशा प्रकारच्या जाहिरातींचे कागद चिकटवलेले असतात. शोधून देणाऱ्यास किती बक्षीस मिळेल हे सुद्धा त्यावर लिहिलेले असते.

श्रीमंत लोक मार्गातले अडथळे न बघता संधीवर लक्ष केंद्रित करतात – भाग १

secret of millionaire mind book in marathi pdf

श्रीमंत लोकं मोठा विचार करतात, गरीब लोकं अल्पसंतुष्ट असतात….. तुमचं व्यक्तीमत्व आणि तुमचा व्यवसाय किती जास्त लोकांवर प्रभाव टाकतयं, त्यावरुन तुमच्याकडे येणार्‍या संपत्तीचा ओघ नक्की होतोय. करोडपती लोकं असे व्यवसाय निवडतात की जो हजारो-लाखो लोकांच्या आयुष्यावर परीणाम करेल. व्यवसायाला अशा पातळीवर नेऊन ठेवतात…….

माणसं जोडावी कशी? …. (भाग ३)

माणसं जोडावी कशी?

कधीकधी व्यावहारीक जगात कितीही समजुतदार असल्या तरी दोन व्यक्ती एकमेकांना खटकु लागतात, तेव्हा दुर होणं, आपली वेगळी वाट निवडणं, अपरीहार्य ठरतं, पण म्हणुन सगळे संबंध तोडूनच वेगळं व्हावं, असही नसतं, हसत खेळत, केलेल्या उपकाराची जाण ठेवुन, आभार मानत, वेगळं होता येतं! न पटणार्‍या गोष्टी आठवुन, कडाक्याचं भांडण करण्यापेक्षा, जुळणार्‍या गोष्टी आठवुन मैत्रीचा सोहळा करत, वेगळं होणं, कधीही चांगलं!..

मुलांचे लाड कितपत करावे?

pampering kids

हे लाडावणं फक्त वस्तूंच्या बाबतीत नसतं. बरेचदा, कामाच्या बाबतीतही असंच होतं. मुलांना त्रास नको, म्हणून प्रत्येक ठिकाणी स्वत:च पुढे होऊन कामं केली जातात. पाण्याचा ग्लास हातात देण्यापासून पाय चेपण्यापर्यंत मुलांची कामं करणाऱ्या, अगदी मुलाच्या मुलालाही स्वतः ची जबाबदारी समजून सांभाळणाऱ्या अनेक आई पाहिल्यायत. मुलं तुम्हाला गृहीत धरू लागतात.

पहिल्यांदाच रिटर्न भरणाऱ्यांसाठी मार्गदर्शक (How to File ITR?)

Income tax return

जर कोणी पहिल्यांदाच ITR फाईल करत असेल, तर अचानक आलेला पाऊस जशी तारांबळ उडवतो तशीच तारांबळ ITR भरताना होत असते. खरतर गोंधळून जायची काहीच गरज नाही. फक्त थोडीशी माहिती जाणून घेतली की काम झालं.

भोजनस्थान कसे असावे…..

निसर्गरम्य वातावरणात जेवणाची मजा काही औरच असते. विशेषतः कष्ट करुन सुर्य डोक्यावर आल्यावर झाडाखाली विसावा घेऊन खाल्लेल्या चटणी, तेल, भाकरीची चव कित्येक वर्षांनी सुध्दा तो प्रसंग आठवताच जिभेवर जशीच्या तशी जाणवते. एखाद्या बागेत जेवताना जेवणाचा स्वाद खुपच रुचकर वाटतो नि एरव्हिपेक्षा चार घास जास्त जेवण सरते.

म्युच्युअल फंड(Mutual Fund) युनिट थेट फंडहाऊसमार्फत की एजंटकडून घ्यावे?

mutual-fund

एजंटमार्फत खरेदी केलेल्या युनिटची NAV कमी असते, त्यामुळे अधिक युनिट आणि पर्यायाने अधिक डिव्हिडंड त्यांना मिळतो. फंड हाऊसच्या दृष्टीने एकाच योजनेचे एजंटमार्फत किंवा एजंटशिवाय घेतलेले युनिट सारखेच समजले जातात. त्यांना एकाच दराने डिव्हिडंड दिला जातो. फक्त त्याचे निव्वळ मालमत्तामूल्य(NAV) कमी अधिक असल्याने विक्री/ खरेदी किंमती वेगवेगळ्या असतात.

मला भेटलेली आजी!

Mla bhetleli aaji

मी त्यांना सांगितलं की, अहो मला आजीला मदत करायची इच्छा आहे! इतक्यात खिडकीतून बघणार्‍या एका पोलिसाने म्हातारीला एक प्रश्न विचारला. म्हातारी घाबरलेली असल्याने त्याचं उत्तर मीच देऊन टाकलं. त्यावर खिडकीतून विचारणारा पोलीस माझ्यावर घसरला, तुम्ही शांत राहा हो.

बॅंगलोर डायरीज् … श्री श्रींच्या सान्निध्यात (भाग- ४)

shri-shri-ravishankar

जेव्हा लहान मुलं चित्र काढतात तेव्हा त्यात ते पुर्णपणे गुंग होऊन जातात. त्यावेळी त्यांना दुसरा कसलाच विचार मनात येत नाही. ते फक्त चित्र काढत नाहीत, ते स्वतःच ते चित्र बनतात. अगदी असंच प्रत्येक काम आपणही तन्मयतेनं केलं पाहीजे. एक तास सर्वजण एक चित्र काढण्यात रंगुन जातात. अगदी लहान मुलासारखं. आयुष्यात काढलेलं हे सर्वश्रेष्ठ चित्र आहे. अशी प्रत्येकाच्या मनात भावना असते.