समृद्धीसाठीचे अफर्मेशन: पैशास पत्र….

Money Happyness

आमच्या सगळ्या स्वप्नांचा डोलारा तुझ्या बळावर तर उभारला जातो.
आयुष्याच्या रोजच्या गुलामगिरीचं जोखड दुर फेकुन मुक्तपणे बागडण्यासाठी हवा पैसा….
माझा ठाम विश्वास आहे, तुझ्या मार्फत जगातली सगळी नसली, तरी बरीचशी सुखं मिळवता येतात,
बघ ना!…. साधं गाडीत पेट्रोल घालण्यासाठी तुच लागतोस,

माझी म्हातारी

Mazi Mhatari

तिला काय माहीत पिझ्झा बर्गर
तिच्यासमोर आहे फक्त चटणी भाकर,
म्हातारीने जपल्यात पोरांच्या आठवणी
त्या पत्र्याच्या पेटीत वह्या पुस्तके आणि पेनसिली…

रेल रोको इन ‘आमची मुंबई’….

Rail Roko in Aamchi Mumbai

चला नेहमीची ट्रेन आली. देशपांडेला आज विंडोसीट मिळाली वाटतं. म्हणजे दोन स्टेशननंतर आपल्याला मिळेल. च्यायला…. हे काय …?? इथे कसा सिग्नल मिळाला हिला?? पुढचे स्टेशन तर जवळ आलंय आणि बाजूच्या फास्ट ट्रॅकवर शताब्दीही थांबलेली दिसते…. अरे बापरे …!! हे काय सगळी माणसे ट्रॅकवरून चालत जातायत.

हात नसतांना नृत्य, तायक्वांदो, कार चालवणेच काय विमानही उडवणारी जेसिका कॉक्स

जेसिका कॉक्स

अ‍ॅरिझोना प्रांतातील सिएरा व्हीस्टा येथील जेसिका कॉक्स. ही विल्यम आणि इनेज कॉक्स यांची दुसरी मुलगी. वडील निवृत्त बॅन्ड मास्टर आहेत. २ फेब्रुवारी १९८३ रोजी जेव्हा जेसिकाचा जन्म झाला तेव्हा तिला खांद्यापासुन दोन्ही हात नव्हते… आज जशी ती वैमानिक म्हणून ओळखली जाते तशी एक उत्तम तायक्वांदो, उत्तम स्कुबा डायव्हर म्हणूनही ओळखली जाते.

फेसबुक डेटा लीक…………

Facebook Data Breach

एखाद्या विशिष्ठ राजकीय पक्षाला स्वतःचा फायदा करून घेता येईल किंवा त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे विरोधी लोकांना बदनाम करता येईल किंवा थोडक्यात दुष्प्रचार करता येईल. बरेचदा आमच्याकडे सोशल मीडिया मार्केटिंगसाठी राजकारणी येऊन त्यांना साध्य करून घ्यायचे इप्सित सांगतात तेव्हा खरतर भारीच करमणूक होते.

पेज थ्री कल्चर ……

ManacheTalks

आपले भावनाशून्य डोळे दुसऱ्यांना दिसू नये म्हणून? सततच्या व्यसनामुळे डोळ्याखाली आलेली काळी वर्तुळं झाकण्यासाठी? सतत भावनाशून्य, व्यावहारिक जगात राहिल्याने रडू येत नसेल का? असे प्रश्न तर खूपच आहेत. उत्तर मात्र एखादा ‘सिलिब्रेटी’ च देऊ शकतो

राजा माणुस कॅटॅगिरी

rchitect

वॉट्सऍप ना खुप गंमतीशीर एप्प आहे. प्रत्येक माणसाच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब त्याच्या पोस्ट मधुन पडत असतं. बराचद्या पोस्ट बघण्यात वेळ घालवायचा की नाही आपण पाठवणार्‍याचं नाव बघुन ठरवायला लागतो.जशा वोट्सएपवर तशा प्रत्यक्ष जीवनातही माणसांच्या काही कॅटॅगिरी असतात.