गेले द्यायचे राहून….शोकांतिकेची गाथा..(भाग ३)

गेले द्यायचे राहून

चि.त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू यांच्या या कवितेचे दोन वेगवेगळे अर्थ लावले गेले. एक अर्थातच प्रेमाच्या प्रकटीकरणाचा होता. आपण आयुष्याच्या या सारीपाटावर सोंगट्या हलावे तसे आपसूक हलत राहतो आणि आपल्या प्रिय व्यक्तीला आपले प्रेम, आपली माया, आपली संवेदना आणि अंतरीचे भाव व्यक्त करायचे राहून जाते.

आपलं माणूस

aapla manus

आपलं माणूस म्हणजे आपलं कुटुंब का? कुटुंबातील सगळीच माणसं आपली असतात का? रक्ताची नाती असलेले खरंच नेहमीच आपला विचार करतात का? उत्तरं दोन्हीकडून आली. हो आणि नाही पण.

तुमच्या आवडत्या शोलेचा क्लायमॅक्स वाचा आणि पहा या लेखात

sholay

दूर हवेलीच्या खिडकीत उभी राहून चितेची धग आपल्या डोळ्यात साठवणारी छोटी बहु विमनस्क चेहऱ्याने चितेकडे पाहत असते. आस्ते कदम ती मागे सरकते आणि खालच्या मानेने खिडकी लावून घेते. या खेपेस तर तिला जगापुढे व्यक्तही होता येत नाही.

नियोजित दीर्घकालीन नफा मोजणी (LTCG) आणि करआकारणी

LTCG

येणार येणार म्हणून गेले चार अर्थसंकल्प सर्वांना हुलकावणी देणारा बहुचर्चित LTCG म्हणजेच शेअरवरील दीर्घकालीन नफा आता काही अटीसह करपात्र ठरला आहे. याआधी तो आयकर कलम १०(३८) नुसार करमुक्त होता. यावरील सर्वसाधारण टोकाची प्रतिक्रिया म्हणून बाजारात मोठी पडझड झाली. याबाबतीतील प्रस्तावित तरतुदी आणि त्याचे गुंतवणूकदारांवर होणारे परिणाम जाणून घेवू या.

टायटॅनिक चित्रपटाचा क्लायमॅक्स वाचा या लेखात..

टायटॅनिक

लोकांनी काळजात गोंदवून घेतलेली हि कलाकृती सिद्ध करते की, आयुष्यातून कारुण्य आणि दुःख वजा केलं तर सुखाला किंमत शून्य उरते. शोकांतिकेच्या गाथेचा हा अर्थ, जगणं आणखी समृद्ध करतो…………निमिषार्धासाठी त्याचा हात घट्ट धरते, विमनस्कतेला हरवत निश्चयाने त्याच्याकडे पाहत उद्गारते, “आय विल नेव्हर लेट गो आय प्रॉमिस !….”

अटकेपार झेंडे- भारतीय सैन्याचे युनायटेड नेशनमधील योगदान

united-nation-mission

ह्या क्षणाला आपण वाचत असताना ११ युनायटेड शांतता मिशन मध्ये तब्बल ६८९१ भारतीय सैनिक पाठवले असून ७८२ पोलीस सुद्धा त्यांच्या जोडीला जगात शांतता आणि सुव्यवस्था राहावी म्हणून आपल्या जीवाची पर्वा न करता देशाचं नाव जगात उज्वल करत आहेत.

पैशाचं झाड असतं का खरंच??

moneyplant

परवा रात्री मी घरातल्या चिल्ल्यापिल्यांना ज्युस प्यायला घेऊन गेलो होतो, सर्वांच्या एकामागुन एक फर्माईशी सुरु झाल्या, आणि बिल झाले, सहाशे नव्वद रुपये. अर्थातच त्यांना बिलाशी काही घेणंदेणं नव्हतं, पण नऊ वर्षाचा सर्वात मोठा पुतण्या म्हणाला, चाचु, इतके मोठे बिल. किती खर्च केला ना आज सगळ्यांनी, आपल्याकडे काय पैशाचं झाड आहे का? पैसे काय झाडाला लागतात का?

लिहावंच एकदा “प्रेमपत्र”… (व्हॅलेंटाईन डे स्पेशल😍)

व्हॅलेंटाईन डे

जमलीच तर स्वतःची नाहीतर बिनधास्त चोरलेली एखादी सुंदर कविता किंवा चारोळी लिहावी आणि एखाद्या सुरेख पाकिटात अत्तर शिंपडावं आणि बंद करून पाठवून द्यावं, खरंच प्रत्येकाने एकदातरी एखादेतरी प्रेमपत्र लिहावं… मग अगदी स्वतःच्या नवऱ्याला किंवा नवऱ्याने बायकोला ! कदाचित वेडेपणा वाटेल हे सगळं करण्याचा. पण हा वेडेपणा आनंद देणारा असेल एवढं नक्की.

Falcon Heavy Rocket नेत आहे मंगळाच्या कक्षेत टेस्लाची गाडी!

या रॉकेटच्या यशस्वी उड्डाणाने, टेस्ला कंपनीची रोडस्टेर हि तब्बल १००,००० डॉलर किमतीची गाडी “Falcon Heavy “मंगळ आणि सूर्याच्या फिरणाच्या कक्षेत स्थापन करणार आहे. आणि यातून मंगळाच्या दिशेने मानवाचं एक पाऊल पुढे जाण्याची आशा नक्कीच वाढणार आहे..

२०१८-२०१९ च्या अर्थसंकल्पातील भांडवलबाजाराशी संबंधित अन्न्यायकारक तरतुदी

दीर्घकालीन नफ्यावर कर नसल्याने तोटा पुढे ओढाता येत नव्हता आता यावर कर आकारणी झाली तर तोटा पूर्वीप्रमाणे पुढील ७ आर्थिक वर्षात ओढता येणार की नाही? याबाबतीत खुलासा होणे जरुरीचे आहे. जर तो पूर्वीप्रमाणेच Carry Forward होत असेल तर १०/१५ वर्षांनंतर मिळणाऱ्या नफ्यावर आपण कर लावतो तर तोट्याची अड्जस्टमेंट फक्त ८ वर्ष करणे हे अन्यायकारक नाही का ?