भारतीयांचं अवकाशात झेपावण्याचं स्वप्न – GSLV MkIII-D2/GSAT-29
आज १४ नोव्हेंबर २०१८ ला इस्रो पुन्हा एकदा आकाशाकडे झेपावत आहे. ह्या वेळेस इस्रोचं सगळ्यात शक्तिशाली रॉकेट जी.एस.एल.व्ही. मार्क ३ आपल्यासोबत ३४२३ किलोग्राम वजनाचा जीसॅट २९ (GSAT-29) हा उपग्रह घेऊन त्याला जी.टी.ओ. म्हणजेच जिओस्टेशनरी ट्रान्स्फर ऑर्बीट मध्ये प्रक्षेपित करेल.